---Advertisement---

आई-वडिलांचे मुलीसोबत संतापजनक कृत्य; कारण वाचून बसेल धक्का!

---Advertisement---

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातल्या कॉशाम्बीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणीला तिच्याच आई-वडिलांनी गळा दाबून मारल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे.

सुत्रानुसार, तेन शाह अलमाबाद गावातले रहिवाशी नरेश यांनी ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीच्या मीसिंगची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी सदरील मुलीचं शव गावाबाहेरच्या ओढ्यात सापडलं.

पोलिस अधीक्षक बृजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, तपासादरम्यान नरेश आणि त्याची पत्नी शोभादेवी यांनी ३ फेब्रुवारी रोजी घरामध्येच मुलीचा गळा घोटून खून केला.

ओळख मिटवण्यासाठी त्यांनी तिच्या शरीरावर बॅटरी अॅसिड टाकलं. नरेशचे दोन भाऊ गुलाब आणि रमेश यांनीही मृतदेह लपवण्यासाठी त्यांची मदत केली होती.

आमची मुलगी अनेक मुलांसोबत मोबाईलवर बोलत होती, असं नरेशने पोलिसांना सांगितलं. तिच्याकडे प्रेग्नंसी किट सापडल्याने संताप आल्याने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment