Pachora : १३ वर्षीय युवकाचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू

Pachora : प्रतिनिधी

शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील १३ वर्षीय युवकाचा विहिरीत तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या बाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील किरण राजू हटकर (वय-१३) हा युवक आज सकाळी आपल्या चुलत भावासोबत गोराडखेडा रोड वरील शेतात चारा घेण्यासाठी गेला असता सकाळी १०:३०  वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जगदीश हटकर यास किरण हा शेतात दिसल्याने त्याने विहिरी जवळ जाऊन पाहिले असता किरण हा पाण्यात पडल्याचे लक्षात येताच त्याने श्रीराम नगर भागात जाऊन सदरील घटनेची माहिती दिली असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व अंबुलन्स बोलवून किरण यास विहिरीतून बाहेर काढून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता मृत घोषित करण्यात आले

या घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदरील घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहे.