स्वच्छ सर्वेक्षणात पाचोरा नगरपरिषदेला ‘थ्रीस्टार’ मानांकन

---Advertisement---

 

पाचोरा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयांकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानूसार सन 2024 वर्षाअंतर्गत झालेल्या स्पर्धेत पाचोरा नगरपरिषदेला ३-स्टार मानांकन प्राप्त झाले असून, यामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयांकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानूसार सन 2024 वर्षाअंतर्गत झालेल्या स्पर्धेत पाचोरा नगरपरिषदेने देखील सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचा निकाल 17 जुलै 2025 रोजी जाहीर झाला. या स्पर्धेच्या विविध निकषांवर काम करीत नगरपरिषदेने एकूण 12500 गुणांपैकी 8294 गुण प्राप्त करुन पाचोरा शहर राज्यात 136 व्या स्थानावर तसेच नाशिक विभागात 9 व्या क्रमांकावर आणि स्वच्छ शहरांमधून देशाच्या 50 हजार ते 3 लक्ष लोकसंख्येच्या गटात 186 व्या क्रमांकाचे तसेच जळगांव जिल्ह्यातील ब वर्ग नगरपरिषदांच्या गटामध्ये 4 था क्रमांकांचे स्थान प्राप्त करीत हागणदारी मुक्त ODF++ व कचरा मुक्त शहर अंतर्गत 3 स्टार मानांकन प्राप्त केलेले आहे. यामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पाचोरा नगरपरिषदेने प्राप्त केलेल्या या यशाबद्ल शहरातून सर्वत्र कौतूक होत असून नागरीकांनी यापुढे देखील नगरपरिषदेस स्वच्छता, आरोग्य व अनुषंगीक बाबींमध्ये सहकार्य केल्यास अधीक यश प्राप्त होऊ शकते, असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे. या स्पर्धेत प्राप्त झालेले यश हे माझ्या आरोग्य विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे मत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---