---Advertisement---
पाचोरा : शासनाच्या निर्देशानूसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वितरण केल्या जाणाऱ्या विविध सेवांचा जलद निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषदेतर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर योजना तसेच मालमत्ता करावरील दंड माफ करणे (अभय योजना), प्रधानमंत्री आवास योजना, पी.एम. स्वनिधी योजनांचे माहितीपर शिबिर १७ रोजी व्यापारी भवनात झाले. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रधानमंत्री सूर्यघर योजना, विविध कंपन्यांचे पॅनल्स, तज्ज्ञ पुरवठादार, वित्त पुरवठ्यासाठी बॅक अधिकारी तसेच वीज कंपनीचे अधिकारी यांना एकाच छताखाली आणून नगारीकांना येणाऱ्या अडचर्णीचे निराकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताकरांचा पूर्ण भरणा करुन शास्ती माफीसाठी ३० सप्टेंबरपावेतो अर्ज सादर करावेत त्या अनुषंगाने शिबीरात अशा मालमत्ताधारकांना माहिती देऊन काहींना त्याचा प्रत्यक्ष लाभदेखील देण्यात आला. 
यावेळी यात अभय योजना,प्रधानमंत्री आवास योजना, सूर्यघर योजना तसेच पी.एम. स्वनिधी योजनाचे माहितीपर स्टॉल नागरीकासाठी लावण्यात आले होते. तरी शहरातील सर्व नागरीक व मालमत्ताधारकांनी शासनाच्या वरील प्रमाणे योजनेचा तसेच मालमत्ता अभय योजनेचा लाभ घ्यावा असे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगीतले. या वेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









