पाचोरा, भडगाव : शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र आणि विधी या शाखांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा घेण्यात आली. युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल पूर्व (प्राथमिक विभाग) येथे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला 280 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.परीक्षेच्या प्रारंभी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षेनंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी उद्धव मराठे, योजना ताई पाटील, शशिकांत पाटील, सिकंदर तडवी, गजू पाटील,संतोष पाटील, डी डी पाटील, उमेश हटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.