---Advertisement---
पाचोरा प्रतिनिधी : राज्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत सर्वत्र जागतिक स्तनपान जागृती सप्ताह साजरा केला जात आहे. यापराशभूमीवर रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पाचोरा, अंगणवाडी जारगाव येथे जागतिक स्तनपान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आले. यावेळी स्तनदा माता, गर्भनी भगिनी यांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजय पाटील, डॉ. मुकेश तेली बालरोग तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. विजय पाटील यांनी बोलताना सांगितले की आईचे दूध हे नव बालकाला एक प्रकारचे अमृत संजीवनी असून त्यामुळे अनेक आजारापासून देखील संरक्षण मिळते. मातेची प्रकृती देखील स्थिरवते.
यावेळी रोटरी क्लब पाचोरा – भडगाव चे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, सदस्य डॉ. पवनसिंग पाटील, चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, डॉ.प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, अरुणा उदावंत, रावसाहेब पाटील यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, डॉ. अमित साळुंखे, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्स, माता भगिनी यासोबत अंगणवाडी सेविका हजर होते.