पाचोरा ग्रामीण रुग्णालयास अतिक्रमणाचा वेढा; प्रशासनाची डोळेझाक

पाचोरा : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष होताना दिसून येत आहे

पाचोरा ग्रामीण रुग्णालय परिसरात रुग्णालयसह प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, भूमिअभिलेख कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे नेहमी या परिसरात वर्दळ असते. ग्रामीण रुग्णालयास दिवसेंदिवस अतिक्रमणाचा वेढा कमी नव्हता वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. इतके कार्यालय या परिसरात कार्यरत असताना अधिकाऱ्यांची सोयीस्कर रित्या डोळेझाक होतानाच चित्र आहे.

या वाढत्या अतिक्रमणाला नेमका कुणाचा आशिर्वाद असा प्रश्न जनसामान्यांतुन उपस्थित केला जात आहे. नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी मागील काळात या परिसरात सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला होता काही काळ सुविधा कक्ष सुरू राहील मात्र त्यानंतर हा सुविधा कक्ष बंद पडला या सुविधा कक्षाला ही अतिक्रमणाचा वेढा पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

या वाढत्या अतिक्रमनामुळॆ वाहन चालकांना मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे. कधी प्रांताधिकारी यांचे वाहन,तर तहसीलदार यांचे तर कधी पोलिस व्हॅन,त्यात सर्वात मोठी कसरत अंबुलन्स चालकांना करावी लागते इमर्जन्सी पेशंटला ग्रामीण रुग्णालयातून घेऊन जाणे व दाखल करण्यासाठी वाढत्या अतिक्रमणामुळे वेळेवर रुग्णास उपचार न मिळाल्यास त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.