सुरेश तांबे
Pachora : पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी २०डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची करोडो रुपयांची जागा ही शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन कवडीमोल भावात विक्री करण्यात आली असल्याचे पणन मंत्री यांच्या लक्षात आणून देत भ्रष्ट्राचारी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निलंबित करण्याची मागणी केली .
पाचोरा -भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनि 50 लाख रुपये घेऊन एका मंत्र्यांच्या दबावाखाली तहसीलदार यांनी ती प्रॉपर्टी दिली असल्याचा आरोप केला .
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निलंबित करण्यात येईल व सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल , असे या अधिवेशनात सांगितले.