---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : समाजात बदनामी केल्याप्रकरणी गुटखा विक्रेतावर गुन्हा दाखल होणेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी शासनहितार्थ व जनहितार्थ विविध क्षेत्रातील विविध प्रकारच्या तक्रारी आपणासह इतर विभागांच्या वरिष्ठांनाकडे पाठपुरावा करून होत असलेल्या चुकीच्या कामांना आळा बसविण्यासाठी तक्रारी करुन शासनाच्या नजरेत आणून देत असतो त्याच प्रकारे अवैध विक्री होत असलेल्या तसेच अवैध वाहतूक होत असलेल्या विमल गुटख्याच्या तक्रारी सतत करित असल्यामुळे पाचोरा शहरातील कुख्यात विमल गुटखा विक्रेता सनी पंजाबी यांच्या जिव्हारी लागल्यामुळे सनी पंजाबी बनावट बतावणी करून माझी सार्वजनिक ठिकाणी बदनामी करण्यासाठी स्वता हुन तो सांगत आहे कि हरिभाऊ तुकाराम पाटील हा मला पाच लाख रुपये मागत होता मी त्याला पाच लाख रुपये दिले नाही, म्हणून तो माझ्या विमल गुटख्याच्या तक्रारी करुन बातम्या प्रसिद्ध करत आहे.
माझी बदनामी करणाऱ्या अवैध विमल गुटखा विक्रेता सनी पंजाबी याने माझी जन माणसात बदनामी केल्या प्रकरणी सनी पंजाबी याचेवर गुन्हा दाखल होणे बाबतची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.तसेच पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत माहे जुन २०२५ मध्ये पाचोरा शहरातील कॉलेज गेट परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अंदाजित 21 लाखांचे 40 पोते विमल गुटखा आढळून आला म्हणून पोलीसांनी त्या गुटख्यावर जप्तीची कारवाई करुन गुटख्यासह सदर चे वाहन पाचोरा पोलीस ठाण्यात जप्त करुन गु.र.नं. 280/2025 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.वरिल प्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यात वाहन चालकाला अटक करण्यात आली होती त्यावेळी वाहन चालकाची पोलीसांनी चौकशी केली असता हा गुटखा कोठुन आणला आणि कोणाकडे घेऊन जात होता त्यावेळी अटकेत असलेल्या वाहन चालकाने पोलीसांना जबाबात सांगितले की हा माल धुळे येथुन भरला आहे आणि पाचोरा येथे सनी पंजाबी याचे कडे पोहोच करायचा होता परंतु तुम्ही मध्येच मला पकडुन घेतले असा जबाब आपल्या अटकेतील वाहन चालकाने दिलेला आहे. वाहन चालकाने सनी पंजाबी याची माहिती पोलीसांना जबाबात दिली याबाबत ची खबर पाचोरा येथील विमल गुटख्याचा मुख्य मालक सनी पंजाबी याला मिळाल्या नंतर सनी पंजाबी हा त्याच वेळी त्याचा मोबाईल बंद करून जळगांव येथुनच परस्पर पसार झाला होता.
आपल्या अटकेत असलेल्या वाहन चालकाने दिलेल्या जबाबाप्रमाणे सनी पंजाबी याला गु.र.नं. 280/2025 मधे मुख्य आरोपी पोलीसांनी केलेले नाही म्हणून मुख्य विमल गुटखा मालकावर वाहन चालकाच्या जबाबनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी निवेदन दिले आहे. तसेच दाखल गु.र.नं. 280/2025 मध्ये मुख्य साक्षीदार म्हणून मला घेण्यात यावे यासाठी देखील लेखी अर्ज दिलेला आहे परंतु सदर गुन्ह्यात मला साक्षीदार म्हणून घेण्यात आले नाही तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा शोध व तपास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेला नाही सदर गुन्ह्यांचा पारदर्शक तपास व्हावा विमल गुटख्याच्या मुख्य मालकावर तसेच विक्रेत्याला ताब्यात घेण्यात यावे यासाठी वारंवार निवेदन, तक्रार अर्ज सादर केलेले आहेत ठोस कारवाई होत नाही उलट दिलेल्या तक्रारींची, अर्जाची. निवेदनाची सविस्तर माहिती विमल गुटख्याच्या मुख्य विक्रेता सनी पंजाबी याला वेळेवर सहज पोहचवली जाते.
विमल गुटख्याच्या तक्रारी कुठेही करु नये या उद्देशाने सनी पंजाबी हा माझी सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो आणि सांगतो कि हरिभाऊ पाटील हा मला पाच लाख रुपये मागत होता मी त्याला पाच लाख रुपये दिले नाही म्हणून तो माझ्या विमल गुटख्याच्या बातम्या प्रसिद्ध करतो तक्रारी करतो, असे बनावट वक्तव्य करून माझी बदनामी सनी पंजाबी हा करीत आहे विमल गुटखा विक्री करणाऱ्या सनी पंजाबी याचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.