जळगाव : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी, मुळजी जेठा महाविद्यालय संचालित रेडिओ मनभावन या सामुदायिक रेडिओ केंद्राला बायोगॅस सयंत्र निर्माता व शास्त्रज्ञ , भाभा अणु संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पदमश्री डॉ. शरद काळे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. आजचे जीवन व विंज्ञान या विषयावर मुलाखत देतांना डॉ.काळे म्हणाले कि आईनी दिलेले संस्कारामुळेच बालपणापासून आपल्या सण उत्सवातून विज्ञान रुजत गेले. सातवी शिकलेली आई माझी वैज्ञानिक गुरु होती.
1965 मध्ये आईने मला नॅनोटेकोलॉजी शिकविली. पुढे बोलताना ते म्हणाले कि आजचे काही पालक मुलांवर अपेक्षा लादताना दिसतात.आपण आपल्या मुलांना सक्षम बनवत नाही त्यांना अवलंबून राहायला शिकवतो हे बरोबर नाही. आपण त्यांना अपंग करतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आमच्या काळात आई वडिलांनी आम्हाला आत्मविश्वास दिला, वाचनाची सवय लावली ,आज टीव्ही मोबाईल बघत आपण बसतो अश्यावेळी मेंदू काम करत नसल्याचे त्यांनी सांगीतले.
ही मुलाखत लवकरच श्रोत्यांना ऐकायला मिळेल अशी माहिती केंद्र संचालक अमोल देशमुख यांनी दिली. याप्रसंगी के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्रसाद देसाई, निवेदिका सुजाता धुरंधर , तंत्र साहाय्यक राहुल पाटील उपस्थित होते.