Masood Azhar: भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादीही मारले गेले. यात जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयही उध्वस्त झाले. दरम्यान पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला १४ कोटी रूपयांची मदत देणार असल्याची बातमी समोर येत आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी मसूद अझहरचे १४ नातेवाईक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत, मसूद अझहरला पाकिस्तान सरकारकडून १४ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या डॉन आणि असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) च्या वृत्तानुसार, मारल्या गेलेल्या लोकांमध्ये मसूद अझहरची मोठी बहीण आणि मेहुणे, पुतणे-मेहुणे, एक भाची आणि अनेक मुले यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर मसूद अझहर या सर्वांचा कायदेशीर वारस असेल, तर त्याला पाकिस्तान सरकारकडून मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.