---Advertisement---

महाराज, आता थांबवा… भारताच्या हल्ल्यांच्या भीतीने पाकिस्तानने केली होती विनंती, आणखी काय म्हणाले संरक्षण मंत्री ?

---Advertisement---

---Advertisement---

Operation Sindoor Discussion in Perliament Today : ऑपरेशन सिंदूरचा उद्देश निष्पापांना न्याय मिळवून देणे हा होता. पाकिस्तानने डीजीएमओला कारवाई थांबवण्याची विनंती केली. भारताच्या जोरदार प्रतिउत्तरासमोर पाकिस्तान झुकला आणि ”महाराज, आता थांबवा” अशी विनंती केली, असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर करण्यापूर्वी भारताच्या सैन्याने प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास केला. भारताकडे अनेक पर्याय होते. परंतु असा पर्याय निवडला की ज्यात दहशतवादी आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना जास्तीत जास्त नुकसान होईल. आणि पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊ नये.

भारताच्या सैन्याने केलेल्या सुसंघटित हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांच्या 9 लपण्याच्या ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यात आला. एका अंदाजानुसार, या लष्करी कारवाईत शंभराहून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, हँडलर आणि सहकारी मारले गेले आहेत. त्यापैकी बहुतेक जण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे होते.

या त्याच दहशतवादी संघटना आहेत, ज्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा उघड पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावामुळे थांबवण्यात आलेला नाही.

भारताच्या जोरदार प्रतिउत्तरासमोर पाकिस्तान झुकला आणि ”महाराज, आता थांबवा” अशी विनंती केली, असल्याचेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---