---Advertisement---

मोठी बातमी! पाकिस्तानच्या मशिदीत बॉम्बस्फोट, ३५ जण जखमी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ३० जानेवारी २०२३। पाकिस्तान मध्ये मशिदीवर बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या दुर्घटनेत काही जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहे.

पाकिस्तानमधील पेशावरमधील एका मशीदी मध्ये नमाज पठण सुरु असताना बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटमुळे मशिदीचा काही भाग कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटमध्ये 35 जण जखमी झाले असून पोलिसांचाही यामध्ये समावेश आहे. या बॉम्बस्फोट मध्ये दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की मशिदीचा एक बाजू संपूर्ण कोसळली आहे.बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच  सुरक्षा यंत्रणांच्या टीम घटनास्थली दाखल झाल्या आहेत. जखमींना पेशावरमधील स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment