कोलकाता : पाकिस्तानचा संघ हा सामना सुरु होण्यापूर्वीच आता वर्ल्ड कपमधून आऊट झाला आहे. कारण सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडने मोठा गेम केला आहे. पाकिस्तानना फक्त हा सामना जिंकायचा नाही तर त्यांना रन रेटही न्यूझीलंडपेक्षा जास्त ठेवायचा आहे, तरच त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. मात्र पाकिस्तानचा सामना सुरु होण्यापूर्वीच गेम ओव्हर झाला आहे. आता पाकिस्तानचा संघ सामान जिंकला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. कारण ते वर्ल्ड कपच्या बाहेर गेले असल्याचे दिसत आहे.
सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता पाकिस्तानच्या संघाला नवीन टार्गेट देण्यात आले आहे. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे. कारण त्यांना १६ चेंडूंत इंग्लंडला काही ऑल आऊट करता येणार नाही. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचा गेम ओव्हर झाला आहे, असे म्हटले जात आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती आयसीसीने दिलेली नाही.
बाबर आझम मायदेशात परतताच सोडणार कर्णधारपद?
भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंच्या वागणुकीमुळे निराश झालेला बाबर आझम भारतातून पाकिस्तानला परतल्यानंतर एकदिवसीय आणि टी२० संघाचा राजीनामा देऊ शकतो.