Under 19 Asia Cup 2024: अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडयिममध्ये खेळण्यात येत आहे. आहे. साद बैग याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मोहम्मद अमान टीम इंडियाची कॅप्टन्सी करत आहे.
पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकात 7 बाद 281धावा केल्या. त्यामुळे 19 वर्षांखालील भारतासमोर विजयासाठी 282धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा करत भारताला विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानसाठी शाहजेब खान याने सर्वाधिक 159 धावांची खेळी केली. तर उस्मान खान याने 60 धावा केल्या. तर मोहम्मद रियाझउल्लाह याने 27 धावांचं योगदान दिलं. परंतु या तिघांव्यतिरिक्त पाकिस्तान संघातील एकाही खेडाळुला दुहेरी आकडा गाठता आला नाही.त्यामुळे आत्ता भारतीय फलंदाज या आव्हानाला कसे सामोरे जातात हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा,निखिल कुमार, किरण चोरमले.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद,शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.