इस्लामाबाद | पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक येथील हक्कानिया मदरशामध्ये आज, शुक्रवारी नमाजादरम्यान मोठा आत्मघाती हल्ला झाला. या भीषण स्फोटात २० जण ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचे लक्ष्य विशेषतः तालिबानचा जनक मानल्या जाणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता. जमीयत उलेमा-ए-इस्लाम-सम (JUI-S) चे प्रमुख मौलाना हमीद-उल-हक आणि त्यांचा मुलगा या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.
हक्कानिया मदरसा हा कुख्यात शिक्षणसंस्थांपैकी एक मानला जातो. अफगाण तालिबानचा उपप्रमुख सिराजुद्दीन हक्कानी आणि तालिबानचा संस्थापक नेता मुल्ला ओमर यांनी येथे शिक्षण घेतले होते. त्यामुळे ‘जिहाद युनिव्हर्सिटी’ असे या मदरशाचे वर्णन केले जाते. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) चा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरक्षेवर चिंतेची छाया
या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आधीच काही देशांकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्याचे जाहीर केले होते. भारतासह इतर देशांच्या क्रिकेट संघांनी पाकिस्तानच्या सुरक्षेवर शंका उपस्थित केल्या होत्या, त्यातच हा हल्ला त्यांच्या चिंतेला बळकटी देत आहे.
PCB आणि पाकिस्तान सरकारने चॅम्पियन्स ट्रॉफी सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल, असे आश्वासन दिले असले तरी, या आत्मघाती हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. ICC आणि सहभागी देश या हल्ल्याची दखल घेऊन आगामी स्पर्धेसाठी पुनर्विचार करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानची सावरगिरी
दुसरीकडे, क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्पेन्सर जॉन्सनने पहिल्याच षटकात रहमनुल्लाह गुरबाझला बाद करत अफगाणिस्तानला धक्का दिला. त्यानंतर इब्राहिम झाद्रान आणि सेदीकुल्लाह अटल यांनी अफगाण संघाला सावरले. अटलने अर्धशतक झळकावत संघाला शतकी पल्ला गाठून दिला, आता ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंच्या प्रभावी गोलंदाजीपुढे अफगाण फलंदाज मोठे आव्हान उभे करू शकतील का हे पाहावं लागणार आहे.