---Advertisement---

रुचकर पालक पनीर कचोरी रेसिपी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।१७ एप्रिल २०२३। आपण आतापर्यंत बऱ्याच प्रकारच्या कचोऱ्या खाल्या असतील. उदा. मटार कचोरी, शेगाव कचोरी, मसाला कचोरी इ. पण तुम्ही कधी पालक पनीर कचोरी ट्राय केली आहे का? नसेल केली तर आजच ट्राय करून पहा पालक पनीर कचोरी घरी कशी बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
२ वाट्या कापलेला ताजा पालक, २ वाट्या मैदा, २ छोटे चमचे जिरं, चार ते पाच हिरव्या मिरच्या, दोन चमचे आलं, दहा ते बारा लसूण पाकळ्या, एक कप बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर, दोन ते तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, पाव किलो ताजं पनीर, एक चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट मसाला, फोडणीसाठी आणि तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, शंभर ग्रॅम बारीक शेव, टोमॅटो सॉस.

कृती 
सर्वप्रथम चिरलेला पालक पाण्यात टाकून जराशी उकळी येईपर्यंत गरम करून घ्यावा. नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकावं आणि त्या घट्ट पालकामध्ये चार हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण पाकळ्या व चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता मिक्सरमधून छान प्युरी बनवून घ्यावी. नंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत चवीनुसार मीठ, दोन हिरव्या मिरच्या, आलं, पाच सहा लसूण पाकळ्या पाणी न टाकता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून चटणी तयार करावी.

मग मैद्यामध्ये दोन-तीन चमचे गरम तेल टाकून त्यात तयार केलेली पालक प्युरी टाकावी. जरासं मीठ टाकून मळून छान एकजीव करून गोळा तयार करावा.
सारणासाठी बारीक चिरलेला कांदा जराशा तेलात चांगला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावा. त्यात किचन किंग मसाला, गरम मसाला, हळद, लाल तिखट घालून छान परतावं. तेल सुटायला लागलं की त्यात चवीनुसार मीठ घालून पनीर कुस्करून टाकावं. मग हे सारण छान एकजीव करून घ्यावं.

आता पालक मिश्रित मैद्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे गोळे करून घ्यावेत. एक एक गोळा गोल लाटून त्यात पनीरचं सारण आवश्यकतेनुसार भरावं आणि मग पालक-पनीर कचोरीचे हे गोळे चांगले बंद करावेत. अशा पद्धतीने सर्व पालक-पनीर कचोरीचे गोळे तयार करून घ्यावे आणि मग एक एक करून मंद आचेवर गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. गरमागरम पालक पनीर कचोरी सर्व्ह करावी.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment