स्वादिष्ट ‘पालक पराठा’ रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ५ एप्रिल २०२३।  ‘पालक पराठा’ ही झटपट तयार होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. हा पदार्थ तुम्ही सहजरित्या घरामध्ये तयार करून त्याचा आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घेऊ शकता. पालकमध्ये झिंक आणि लोहाचे घटक जास्त प्रमाणात असतात. हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत. पालक पराठा कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
२०० ग्रॅम पालक,३ कप गव्हाचे पीठ, २ चमचे तूप, २ चमचे कॅरम सीड,  मीठ, १ कप दूध

कृती 
सर्वप्रथम, पालक स्वच्छ करून पाण्यामध्ये धुऊन घ्या. आता पालकची ताजी पाने मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ, दोन चमचे ओवा (Carom Seeds), एक चमचा तूप आणि वाटलेली पालकची पेस्ट घालावी. सर्व सामग्री नीट मिक्स करा आणि पीठ मिळून घ्यावे. यामध्ये आता दूध मिक्स करा म्हणजे पीठ मऊ होईल. आता मळलेल्या पिठाचे लहान- लहान आकारात गोळे तयार करा. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला थोडेसे कणिक व तूप लावा आणि पराठे लाटून घ्यावे. गॅसवर तवा गरम होण्यास ठेवून द्या. तवा गरम झाल्यानंतर त्यावर पराठ शेकून घ्यावा. दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीने पराठा शेका. त्यावर थोडेसे तूप देखील लावा. तूप लावल्याने पराठे नरम राहतील. तयार झाला आहे आपला पालक पराठा. दही, लोणचे किंवा चटणीसोबत पराठ्याचा आस्वाद घ्या.