Earthquake : . पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रात्री 9 वाजून 52 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
तलासरी, उधवा, मोडगाव ,धानिवरी, धुंदलवाडी, कासा ,उर्से या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप 4.1 रिश्टर स्केल तीव्रते होता
या भूकंपामुळे कोणालाही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. याआधीही 3 जानेवारी रोजी दुपारी 1:47 वाजता पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. अधिकार्यांनी भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे हे स्पष्ट केले नाही.
मागीलवर्षी 2023 मध्येही पालघरमध्ये 3.5 आणि 3.3 तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले होते.