‘पॅन’ होणार निष्क्रिय?

तरुण भारत लाईव्ह न्युज : पॅन Permanent Account Number आणि आधार कार्ड Aadhar यांना एकमेकांशी संलग्न करण्याची मुदत आज, शुक्रवारी ३० जून रोजी संपत आहे. दोन्ही क्रमांक एकमेकांना जोडण्याची सुविधा प्राप्तिकर विभागाने आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. ही प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण न केल्यास पॅन धारकांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

व्यक्ती आणि व्यवसाय यांच्यासाठी पॅन क्रमांक अत्यंत महत्त्वाचा आहे. आधार क्रमांक हा मात्र प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. या दोन्ही क्रमांकांचा उल्लेख प्रत्येक गुंतवणूक, व्यवहार यांसाठी करण्यामध्ये होणारा गोंधळ दूर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने हे दोन्ही क्रमांक जोडण्याचे आवाहन हे क्रमांक असलेल्या नागरिकांना केले आहे.

 

पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी ‘हे’ नक्की करा

  • आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर Tax e-Services हे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा. PAN subcategory च्याखाली ‘Know your PAN’ हे ऑप्शन दिसेल.
  • त्याच्या बाजूला असलेल्या रकान्यातील बाणांवर टॅप करा.
  • त्यानंतर पोर्टलवरील ई-फायलिंग लिंकवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर जाण्यासाठी तेथे आवश्यक तपशील भरा.
  • तपशील भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यात पॅन कार्डच्या स्थितीबाबतची माहिती दिसेल.