तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : एक हजार रुपयांचे विलंब शुल्क देऊन Pancard link पॅनकार्डला बायोमेट्रिक्स पद्धतीने आधाराशी संलग्न करण्याची अंतिम तारीख 30 जून होती. ज्या करदात्यांनी या तारखेपर्यंत दोन्ही कार्ड लिंक केले नाही, ते आयकराशी निगडित सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, पॅन पुन्हा अॅटिव्ह करता येणार नाही. त्यासाठी भूर्दंड भरून पॅनकार्ड पुन्हा अॅक्टिव्ह करता येऊ शकते.
काय आहेत नियम
1 जुलै 2023 पासून आधारकार्डाशी पॅन संलग्न न केल्यास Pancard link पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. याशिवाय उच्च रकमेचा टीडीएस कापला जाईल. आयकर अधिनियम 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी पॅन आधारशी संलग्न करणे अनिवार्य राहणार आहे. भूर्दंड भरल्यानंतर करदाता आपले पॅन पुन्हा सुरू करू शकणार आहेत. ही प्रकि‘या नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेडच्या पोर्टलवर चालान सं‘या आयटीएनएस 280 अंतर्गत प्रमुख शीर्ष 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त आयकर) आणि लघु शीर्ष 500 अंतर्गत (इतर रिसिट्स) रक्कम भरून करता येईल.
अशा प्रकारे पॅन पुन्हा सक्रिय करा
28 मार्च 2023 ला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अंतर्गत जारी अधिसूचनेत म्हटले आहे की, 1000 रुपयांची पेनल्टी भरून संबंधित अॅथॉरिटीला आधारकार्डची सूचना देऊन 30 दिवसांच्या आत पॅन कार्ड पुन्हा अॅक्टिव्ह करता येईल.
अशी असेल प्रक्रिया –
- यासाठी सर्वांत आधी आयकर विभागाच्या ई फायलिंग संकेतस्थळावर आपल्या खात्याने लॉग इन करावे लागेल.
- त्यानंतर पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याच्या पर्यायवर क्लिक करावे.
- या लिंकवर क्लिक केल्याने तुम्हाला वैयक्तिक माहिती मागितली जाईल. सर्व कॉलम भरल्यानंतर 1000 रुपयांचा भूर्दंड भरावा लागेल.
- इथे तुम्ही ई-पे टॅक्सच्या माध्यमातून भूर्दंड भरू शकता. याची सूचना संबंधित आयकर विभागाला द्यावी लागेल.