पाणीपुरी खातायं ? सावधान, होऊ शकते धोकादायक इन्फेक्शन !

तरुण भारत लाईव्ह । नागपुर : खरंतर पाणीपुरी खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. पण जर तुम्हाला पावसाच्या दिवसात पाणीपुरी खात असाल तर खबरदारी घ्यायलाच हवी. तर झालं असं पाणीपुरीमुळे नागपुरात एका विद्यार्थिनीला गॅस्ट्रोची बाधा झाली. त्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. तसेच, दोन विद्यार्थिनींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत असून दूषित पाणीपुरी खाल्ल्यामुळे तिघींना गॅस्ट्रोची होती.

दरम्यान, या तिघीजणी मेडिकलशी संलग्नित बी.एससी नर्सिंगच्या होत्या. या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आता अन्न व सुरक्षा विभागाच्या (एफडीए) अन्न शाखेला जाग आली असून या विभागाने मेडिकल प्रशासनाला या प्रकरणाची माहिती मागितली आहे. त्यामुळे तुम्हीसुध्दा पाणीपुरीची चव चाखण्यासाठी जात असाल तर आजूबाजूला स्वच्छता आहे की नाही हे जरुर पाहा.