---Advertisement---

पाणीपुरी विक्रेत्यास लुटले, आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

---Advertisement---

भुसावळ : शहरातील पाणीपुरी विक्रेत्याकडील रोकड लुटणार्‍या तसेच महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील वाल्मीक नगरातून मुसक्या बांधल्या आहेत. केवल अनिल टाक (वाल्मिक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दोन गुन्ह्यात संशयित होता पसार
भुसावळ शहराातील राम मंदिर वॉर्डातील कन्हैया जगन्नाथ बायाम याच्या पाणीपुरीच्या दुकानावर शहरातील वाल्मीक नगरातील रहिवासी केवल अनिल टाक याने शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता पाणीपुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्यानंतर विक्रेत्याला चाकू दाखवत मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार शंभर रुपये लुटून त्याची दुचाकी लांबवली होती शिवाय शहरातील वाल्मिक नगरातील 26 वर्षीय महिलेच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करीत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून चापटा बुक्क्यांनी महिलेला मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यात आरोपी पोलिसांना हवा होता.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार रवींद्र नरवाडे, हवालदार कमलाकर बागुल, अनिल देशमुख, रणजीत अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख आदींनी वाल्मीक नगरातून आरोपीला रविवारी अटक केली. आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment