---Advertisement---
Sanjay Savkare : भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरुन संजय सावकारे यांची उचलबांगडी करण्यात आली असून, या पदाची जबाबदारी आता गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, अशी चर्चा रंगली आहे.
कोण आहेत डॉ. पंकज भोयर ?
डॉ. पंकज भोयर यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकिटावरून ते वर्धा विधानसभेत आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव करीत विजयी झाले. २०२४ च्या निवडणूकीत पुन्हा काँग्रेसचा पराभव करून विजयी झाले. यामुळे डॉ. पंकज भोयर यांनी सलग तीनदा निवडून येत वर्धा विधानसभा क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले. महायुती सरकार मध्ये डॉ. पंकज भोयर यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद असून, आता त्यांना भंडारा पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आले आहे.
सावकारे यांची उचलबांगडी का ?
पालकमंत्री म्हणून संजय सावकारे हे पूर्णकाळ उपलब्ध नसायचे. जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना, देखील ते आले नव्हते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावे, अशी नागरिकांचीकडून होत होती. यामुळे महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.









