पंकजा मुंडे-धनजंय मुंडे यांच्यात जुंपली, काय कारण?

बीड : परळीत विकास कामांच्या उद्घघाटनावरून मुंडे बहीण भावात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी आमचे सरकार असताना आमच्या कामाचे उदघाटन तुम्ही का करता? असा सवाल उपस्थित केला होता. पंकजा मुंडे यांच्या प्रश्नाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, पण तुम्ही मागच्या ५ वर्षाच्या काळात लोकांचे कल्याण केले नाही, हे दुर्दैव आहे, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. परळीच्या टोकवाडी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी मागच्या ३ वर्षात मंत्री असताना, माझ्या मतदार संघातील लोकांचे जीवनमान उंचावन्याचे काम केले. मात्र हे मागच्या लोकांनी का केले नाही? ही काही टीका नाही, मात्र ते आम्हाला म्हणतात की फक्त आयत्या पीठावर रेघोट्या मारत आहेत. पण मग आम्हालाही तुमच्या मागच्या 10 वर्षात तुम्ही कोणते विकास कामे केली ? हे आम्हालाही विचारण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही विचारात नाहीत ते आम्हाला काढायचे नाही’.

‘आम्हाला फक्त या मतदार संघातील जनतेचा विकास करायचा आहे. म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधला. तर वैद्यनाथ कारखान्यावरुन देखील टीका केली. जलजीवन मिशन योजना केंद्राची आहे. अन यात माझा काय संबंध. पण महाविकास आघाडी सरकार असताना या गावातील योजनेचा आराखडा मी अगोदरच केला आहे. म्हणून मी ठोकपणे हे भूमिपूजन करत आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

‘सरकार जरी बदललं तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही. कारण कोणतंही सरकार आले तरी या परळीला दिल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही, अशी तरतूद मी केली आहे, असेही धनंजय मुंडे बोलताना म्हणाले. तर येणाऱ्या २ वर्षाच्या काळात मी या मातीचा कायापालट करणार, असेही ते बोलताना म्हणाले. असे एक तरी काम आपण केले आहे का? असा सवालही नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना केला.

तर पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 2010 ला मला माझ्या घरातून बाहेर काढलं. मला पक्षातून काढलं. मला शिव्या दिल्या.. मात्र 2017 ला पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली, अन खऱ्या अर्थाने इथून मी राष्ट्रवादीला मजबुती दिली..फक्त मीच नाही तर माझ्या सोबत मी माझ्या सहकार्यांनाही मोठं केलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या मानातील खदखद ही व्यक्त केली.