फलटण : मराठा आरक्षणाबाबत आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा आरक्षणासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचं मत विचारा. मराठा समाजाच्या आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं जो मसुदा तयार केला तो जबाबदार आहे. जर तो मसुदा नीट असेल, तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देता येईल, असं प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.
पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमाचे फलटण येथे आगमण झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांबाबत जो प्रकार झाला त्या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या मराठा आरक्षणाबाबत माझ्यासह मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मत ठाम आहे. त्यामुळं आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा याबाबत संबंधित कमिटीला का विचारत नाही, असा सवाल त्यांनी केला.