तरुण भारत लाईव्ह ।१२ फेब्रुवारी २०२३। नाश्त्याला दररोज काहीतरी वेगळं खावंसं वाटत. पण रोज रोज करायचं काय हा प्रश्न पडतो. नाश्त्यासाठी एक वेगळी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. शेवयांचा उपमा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
शेवया, कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा. त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळलं अर्थात शेवया शिजल्या की पाणी काढून टाका. नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला.वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून नीट शिजवून घ्या. वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. आणि सर्व्ह करा शेवयांचा उपमा