Lucky Zodiac Sign : ज्योतिषशास्त्रानुसार, २९ एप्रिल २०२५ चा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी परशुराम जयंती असून, काही विशेष योगही जुळून येत आहेत. त्यामुळे २९ एप्रिल २०२५ चा दिवस काही राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. या दिवशी जुळून येणाऱ्या शुभ योगांचा काही पाच राशींना विशेष लाभ होणार आहे. या योगामुळे पाच राशींचे नशीब उजळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ‘या’ पाच राशी.
मकर राशी – २९ एप्रिल व त्या नंतरच्या काही दिवसात मकर राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. या शुभ योगामुळे मकर राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. तसेच धन लाभाचे नवीन मार्ग निर्माण होतील. गेल्या काही दिवसांपासून जे काम किंवा काही योजना रखडल्या असतील त्या मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. एकंदरीत लाभाचे संदेश असून तुमच्या आत्मविश्वास मजबूत होईल.
कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांसाठी २९ एप्रिलचा दिवस खूप शुभ राहील. आज आनंदवार्ता कानावर येतील. प्रलंबित असलेले कार्य पूर्ण होतील. करिअरच्या दृष्टीनेदेखील आजचा दिवस शुभ राहील. मानसिक ताण कमी होईल. तसेच आरोग्यसाठी हा दिवस चांगला असून, त्यात सुधारणा होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी दिवस चांगला राहील.
वृषभ राशी – वृषभ राशीच्या लोकांसाठी 29 एप्रिलचा दिवस खूप चांगले शुभ संकेत देणारा ठरेल. रखडलेले काम मार्गी लागतील. आर्थिक चणचण दूर होत धनलाभ होईल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही गेल्या दिवसांपासून नवीन काम सुरू करायच्या विचारात असाल तर ही योग्य वेळ आहे. तसेच आत्मविश्वासात वाढ होत मनशांती लाभेल.
सिंह राशी – गेल्या काही दिवसांपासून सिंह राशीचे लोक अनेक समस्यांना तोंड देत होते मात्र आता समस्या सोडण्यास मदत होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. आत्मविश्वासात वाढ होऊन कामात चांगली कामगिरी कराल. नवीन लोकांची ओळख होत त्यांच्याकडून मदतीचा हात मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रगती साधने मदत होईल.
मिथुन राशी – मिथुन राशीच्या लोकांसाठी परशुराम जयंतीचा दिवस खास आहे. नशिबाची साथ मिळेल. करिअरच्या दुर्ष्टीनेही हा दिवस महत्वाचा आहे. नातेसंबंधातील दुरावे दूर होतील. नवीन लोकांची भेट होत ही लोक भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. जीवनात उत्साह तसेच प्रगतीच्या नवीन वाटा निर्माण होतील.