---Advertisement---
मुबारकपूर, ता.शहादा : तालुक्यातील कोचरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत गुरुवारी (१० जुलै) रोजी पालक-शिक्षक बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शिक्षक अमोल पवार आणि विशाल चव्हाण यांनी पावसाळ्यात शाळेत होणाऱ्या समस्या मांडत, विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सरपंचासह, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक व ग्रामस्थांनी या समस्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी सरपंच नवनाथ वाघ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पवार, उपसरपंच विजय मुसळदे, माजी सरपंच राजू सोनवणे, ग्रा.पं.सदस्य गौरीबाई ठाकरे, ललिताबाई ठाकरे, लक्ष्मी माळी, बदल ठाकरे, रविन निकुम, विनोद ठाकरे, गणेश ठाकरे, मुख्याध्यापक वासुदेव महाले, शिक्षक शिवाजी महाले, विशाल चव्हाण, अमोल पवार, शिवराम तडवी, निलेश अहेर, रविंद्र ठाकरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शिक्षक विशाल चव्हाण यांनी मानले.