नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अविस्मरणीय केले आहे. १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं तिने नावावर करून इतिहास घडवला.
इतिहासात भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. १९०० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली होती.
त्यानंतर अशी कामगिरी करणारी मनु ही पहिलीच भारतीय ठरली होती. आज तिला एक पाऊल पुढे टाकण्याची संधी होती, परंतु शूट ऑफमध्ये तिचे ऐतिहासिक तिसरे पदक थोडक्यात हुकले.