Paris Olympics 2024 : दुपारी 12.30 पासून मनू भाकरची स्पर्धा, पदकांच्या हॅट्ट्रिककडे असणार लक्ष

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 7 व्या दिवशी चाहत्यांना मनू भाकर आणि शटलर लक्ष्य सेन यांच्याकडून पदकाच्या आशा आहेत. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना तिरंदाजी आणि ज्युडोमध्येही पदक जिंकण्याची संधी आहे.

मनूने याआधीच सलग दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला आहे. तिने 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत आणि 10 मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत पदके जिंकली आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.

आता मनूला केवळ हॅट्ट्रिक करण्याची संधी नाही, तर 3 ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचीही संधी आहे.