कोलकाता : देशाच्या संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ललित झा या तरुणालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. लिलितची कसून चौकशी करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाखासदाराने घुसखोरीचा मास्टरमाईंड ललितचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये, तो TMC खासदार तापस रॉय यांच्यासोबत दिसून येत आहे.
संसदेत प्रवेश केलेल्या युवकांना म्हैसूरचे भाजपा खासदार प्रतापसिंह यांच्या पासवर प्रवेश मिळाला होता. त्यामुळे, त्यांच्यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता, या घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा याचा फोटो तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस रॉय यांच्यासोबत दिसून आला आहे. प. बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांतो मजूमदार यांनी हा फोटो शेअर केला आहे. आपल्या लोकशाहीच्या मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड ललित झा, गेल्या अनेक महिन्यांपासून टीएमसी खासदार तापस रॉय यांच्याशी घनिष्ठ संबध बाळगून आहे. याप्रकरणी खा.तापस रॉय यांची मिलिभगत असल्याचा हा पुरावा पुरेसा नाही का?, असा सवालही मजूमदार यांनी विचारला आहे.
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनीही हा फोटो शेअर केला आहे. तसेच, याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्वांचे संबंध आत्तापर्यंत काँग्रेस, समाजवादी पार्टी, आणि टीएमसी यांच्यासमवेत आढळून आले आहेत, असे मालविय यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता संसदेतील घुसखोरीनंतर राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसून येतं आहे. विरोधक भाजपा खासदाराच्या चौकशी मागणी करत आहेत. तर, भाजपाकडून टीएमसी खासदारांच्या चौकशीची मागणी होत आहे.
Mamata Banerjee can’t remain silent on Lalit Jha’s association with her senior party leader Tapas Roy. It is not a surprise that TMC MPs, scared of their party’s association emerging with those who breached Parliament security, were creating ruckus. This is a new low even by… https://t.co/17GqfURHds
— Amit Malviya (@amitmalviya) December 15, 2023