Parliament Security Breach Main Accused Lalit Jha Arrest:
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी या घटनेतील सहाव्या आरोपी आणि कथित सूत्रधाराला अटक केली. आरोपी ललित झा याला दिल्लीतून अटक करण्यात आली.
या घटनेचा कथित मुख्य सूत्रधार मानला जाणारा ललित झा याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
याआधी पोलिसांनी दहशतवादविरोधी कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली सुरक्षेतील त्रुटींबाबत गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला की, भारतातील ब्रिटीश राजवटीत क्रांतिकारक भगत सिंह यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याच्या घटनेची त्यांना पुनरावृत्ती करायची होती.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी स्मोक बॉम्बचा वापर करून संसदेत पत्रके फेकण्याची योजना आखली होती. त्यांनी तिरंगा झेंडेही खरेदी केल्याचे त्यात म्हटले आहे.
Parliament security breach accused, Lalit Mohan Jha arrested by Delhi Police
— ANI (@ANI) December 14, 2023
संशयित मुख्य सूत्रधार ललित झा याच्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांच्या विशेष कक्षाने एनजीओचे संस्थापक नीलक राख यांच्याशी संपर्क साधला होता. झा हा कोलकाता येथील एका NGO चा भाग असल्याचे सांगितले जाते. ललित झा याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अनेक पथक प्रयत्न करत होते. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, तो मुख्य कटकारस्थानांपैकी एक आहे
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आतापर्यंत चारही आरोपींनी असा दावा केला आहे की त्यांनीच संपूर्ण घटनेची योजना आखली आणि ती राबवली.”