---Advertisement---

पारोळा तालुक्यासह एरंडोल’ला अवकाळीने झोडपले, आमदार अमोल पाटलांनी केली पाहणी

---Advertisement---

पारोळा : पारोळा तालुक्यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील काही भागांत बुधवार, २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यात मक्का, ज्वारी, बाजरी, भुईमुंग, भाजीपाला पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झालेय. दरम्यान, आमदार अमोल पाटील यांनी पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पिकांवर लावणीपासून तर आज उभी असलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी काबाळ कष्ट करून, कसाबसा पैसा उभा करून शेती केली होती. सद्यस्थितीत शेतातून हि पिके काढून त्यांची विक्री करून आपला दैनंदिन उदरनिर्वाह हा बळीराजा भागवणार होता. परंतु या गारपिटीसह अवकाळी पावसाने या बळीराजाच्या शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त केली. यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.

नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील करमाडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन गारपिट व अवकाळी पाऊसाने (Hail and unseasonal rain) झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सदर नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करून. आढावा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सादर करणार असून, शेतकऱ्यांना सदर नुकसानीचा संपूर्ण मोबदला मिळण्याचे संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ठोस आश्वासित केले.

या प्रसंगी देवगांव सरपंच समिर पाटील, तहसिलदार अनिल पाटील, करमाड सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

धरणगावातही रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धरणगाव तालुक्यातील बहुतांश भागातील बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरळक पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात बाजरी, मका, दादर आणि गव्हाच्या पिकांसह कापणीला आलेले पीक आडवे झाले असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात अचानक बदल झाला आहे. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पिके आडवी पडली असून, काही ठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मोठा फटका बसणार असून उत्पन्नात घट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

तसेच बुधवार रात्री परीसरातील विजेचा कडकडासह जोरात वारावादळ व पाऊस आल्याने उत्पादनावर मोठा परीणाम होणार असल्याने शेतकरी भयभीत झाला आहेत. वाऱ्यामुळे विशेषतः बाजरी, मका दादर आणि गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गव्हाच्या दाण्याला भर येण्याच्या काळात अशा प्रकारची आपत्ती आल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. मक्याच्या पिके आडवी झाली असून, काही ठिकाणी संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले असून, बाजीच्या कणसांवरही परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सद्या तालुक्यातील पुर्वत्तर भागातील ग्रामीण शिवारात अनेक गावांना या अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे. काही गावांमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतात उभे असलेले पीक आडवे झाले आहे पिंपळे बुद्रुक पिंपळे खुर्द गंगापुरी,पष्टाणे,साळवा, साकरे, नांदेड तसेच अनोरे धानोरे पिप्री सोनवद सह आदी गावात सोसाट्याचा वारा वाहत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment