पसायदान : भारतीय संस्कृतीचा जाहीरनामा!

इतस्ततः

– प्रा. दिलीप जोशी

Pasaydan मला जर कोणी विचारलं की, काय आहे तुमची भारतीय संस्कृती? तर, मी त्याला माउलींचे पसायदान देईन आणि सांगेन, ही आहे आमची भारतीय संस्कृती.

एका अर्थाने पसायदान Pasaydan म्हणजे भारतीय संस्कृतीचा जाहीरनामाच! ‘पसायदानङ्क ज्ञानेश्वर माउलींनी लिहिलेल्या नितांत सुंदर अशा ‘ज्ञानेश्वरी’ नावाच्या ग्रंथातील मागणं. केवळ मागणं नव्हे तर विश्व शांती प्रार्थनाच! या पसायदानाचा शेवट मोठा गमतीचा, गुह्य आणि सुंदर आहे. Pasaydan प्रसंग असा घडला. माउलींनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि ते आपले ज्येष्ठ बंधू आणि गुरू संतश्री निवृत्तिनाथांसमोर तो ग्रंथ घेऊन आले.

Pasaydan निवृत्तिनाथ वर बसलेले, त्यांच्या पायाशी संत ज्ञानेश्वर माउली बसले. निवृत्तिनाथांना माउलींनी ग्रंथ हाती दिला. ”दादा, तुम्ही मला जे सार चोजविले ते गुह्य शब्दांत प्रकट केले. तुझे तुलाच!” असे म्हणून तो ग्रंथ दादांच्या हाती दिला. निवृत्तिनाथांनी तो गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिला. नाथ अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, ”मी आनंदित आहे. अरे! तुझ्या हातून हे ब्रह्मरसाचे संतर्पण घडले. मला अतीव आनंद होतोय!Pasaydan माग, तुला काय मागायचे ते माग!” माउली म्हटले, ”नक्की मागू!” नाथ म्हणाले, ”माग.” माउलींनी एक कागद घेतला. हाती बोरू घेतला आणि लिहायला सुरुवात केली… सर्वांना वाटू लागलं की, काय मागताहेत माउली. काहीतरी स्वतःसाठी मागून घेतील. मोक्ष, अष्टसिद्धी, योग, याग विधि. सर्वांना उत्सुकता. ज्ञानदेवांनी कागद लिहिला आणि उलटा करून निवृत्तिनाथांच्या हातात दिला. नाथांनी तो कागद वाचला. Pasaydan म्हणाले, ”अरे! हे काय मागितलंस! अरे! स्वत:साठी काहीतरी माग. आयुष्यभर इतरांसाठी जगला. हालअपेष्टांना सामोरे गेला. अपमान, निंदा , शारीरिक आणि मानसिक त्रास भोगूनही तू स्वत:साठी मागत नाही. पाहिजे ते देण्यास मी समर्थ आहे. Pasaydan माग स्वत:साठी काहीतरी.” पण माउली ऐकेनात. ती म्हणाली, ”मला कागदावर जे लिहिलं तेच पाहिजे.”

Pasaydan असा बराच वेळ दोघांमध्ये लटिका वाद झाला. नाथ म्हणायचे, स्वतःसाठी काहीतरी माग आणि ज्ञानोबा माउली म्हणायची, मला हेच पाहिजे. हा प्रेमळ वादविवाद काही काळ चालला खरा; पण जसा एखादा मुलगा आपल्या आईला चॉकलेटसाठी रुपया मागतो आणि आई म्हणते, दात खराब होतात. मी पैसे देणार नाही, अशी बराच काळ दोघांत चकमक झाल्यावर शेवटी आई आपल्या चंचीतून कलदार काढते आणि रागाने म्हणते घे, जा! मर एकदाचा!! बस, तसेच घडले इथे माउली आणि नाथ यांच्यात बराच काळ वादसंवाद सुरू असताना. शेवटी दृष्टादृष्ट विजये होवावेजी माउली आणि निवृत्तिनाथ एकमेकांकडे पाहतात. Pasaydan ‘येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो’ तेथे नाथ तो कागद घेतात आणि ज्ञानेश्वरांच्या अंगावर पातळ होऊन तो कागद फेकून म्हणतात, हाऽऽ होईल दान पसावो. ”जां लेका घे! दिलं तुला दान.” असं म्हटल्यावर, हे शब्द कानी पडताच ‘येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला” असा वर मिळाल्यावर माउली सुखी झाल्या. Pasaydan काय होतं कागदावर? कागदावर लिहिलेले होते…

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,

तोषोनि मज द्यावे पसायदान हे।

पुन्हा एकदा सिद्ध होते की, ज्ञानेश्वरांना माउली का म्हणायचे. ज्यांनी आपल्या गुरूजवळ स्वतःसाठी काहीही न मागता सर्वकाही विश्वासाठी मागितले. ते हे पसायदान ! Pasaydan या पसायदानाची सुरुवातही मोठी विशेष आहे. आता… आता हां उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा हां शब्द. पण तो सुरुवातीलाच आला. खरं तर उभयान्वयी अव्यय मध्ये हवा, पण इथे तर सुरुवातच ‘आता’ ने. आधी जर आहे तर त्याच्या आधी कुणाला तरी जोडले असेल. म्हणूनच तो आपल्या जीवनाला जोडणारा शब्द आहे. माउलींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विश्वात्मक परमात्म्याला साद दिली. Pasaydan म्हणजे माउली प्रार्थना करताहेत ती अखिल विश्वातील चराचरांसाठी. त्यांनी ‘आता विठ्ठल देवे, ब्रह्मा देवे, शिव देवे’ असे म्हटले नाही. म्हणजे धर्म पंथ तर सोडाच, पण प्रांत देश या पलीकडे जाऊन त्यांनी दान मागितले. त्यात काय हिंदू अन् मुसलमान अन् काय ख्रिश्चन. विश्वातील सर्वांसाठी हे पसायदान मागताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिखाणाला ‘वाग्यज्ञ” म्हटले. Pasaydan यज्ञाची पूर्णाहुती सर्वस्व अर्पणाने असते. माउलींनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला सर्वस्व अर्पण केले आहे.

पसायदान म्हणजे प्रसाददान म्हणतात. माझ्या दृष्टीने पसायदान म्हणजे पसाभर म्हणजे अत्यल्प दान. म्हणजे थोडी अपेक्षा. जे निवृत्तिनाथांच्या दृष्टीने म्हटले आहे. म्हणजे नाथांचे सामर्थ्य, देण्याची क्षमता याहून प्रचंड पण माउलींनी फक्त पसाभर म्हणजे ओंजळभर मागितले. ‘खलजनांतील वाकडेपणा नष्ट होऊ दे।’ किती योजक शब्द आहे. खलजन नष्ट करण्याची मागणी नाही तर त्यांच्यातील दृष्ट वृत्ती नष्ट करण्याची मागणी. त्यातही ‘व्यंकटी’ शब्द मार्मिक आहे. ‘व्यंकटी’ म्हणजे नेहमीच वाकड्यात जाणारा. माणूस खराब, भांडकुदळ असला तरी परवडतो, पण तो व्यंकटी नको. Pasaydan अशा माणसातला वाकडेपणा नष्ट होऊ दे. तो माणूस नाही. किती मायाळ मागणं. म्हणून तर ती माउली! भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘विनाशायच दुष्कृताम् म्हणजे साधूंचे रक्षण आणि दृष्टांचा नाश; पण माउली योगेश्वर भगवंतापेक्षा वेगळी. Pasaydan ती दृष्टांचे निर्दालन म्हणत नाही तर दृष्टत्व निर्दालन म्हणते. हां सांद्रकारुण्य भाव फक्त मातृ हृदयातच असतो. दृष्टपणा नष्ट होऊन अशी सर्व मंडळी सन्मार्गाला लागावी ही त्यांची इच्छा. माउली विचार करताना फक्त मानवमात्राचा नाही तर ‘भूता परस्परें जडो मैत्र जीवाचे.” Pasaydan केवळ एखादा दिवस ‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे मैत्री दिवस साजरा करणारे कुठे आणि रोज प्राणिमात्रांसह मैत्रीचा विचार मांडणारे कुठे!

Pasaydan सर्वांच्याच जीवनातला अंधार नष्ट करण्याचा विचार करतानाही ‘विश्व स्वधर्म सूर्य’ म्हणजे अखिल विश्वाचा विचार त्यांनी मांडला. माउलींनी ज्याला जे जे हवं म्हणजे इथे सदिच्छा अर्थांनी घेतले पाही. त्यातही फक्त माणूस नाही तर प्राणीजात म्हणजे सर्व प्राणिमात्रांचा विचार केला आहे. ‘जीवदया’ हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. सकळ मंगलाचा वर्षाव, ईश्वरनिष्ठ लोकांची मांदियाळी ही सर्व मंगलमय वातावरणाची सदिच्छा माउलींनी प्रकट केली. ही सज्जन शक्ती म्हणजे चालते बोलते कल्पतरू अरण्य, चेतन असे चिंतामणीचे गांव, अमृतमयी सज्जन सागर अशा सद्भक्तांची गर्दी. Pasaydan असे अद्भुत आणि अलौकिक मागणं फक्त आईच मागू शकते. बरं, या सज्जनांचा किती सुंदर विचार मांडला. अलांच्छन म्हणजे बेदाग चंद्र, तापहीन सूर्य म्हटले. सोयरे म्हणजे पक्क्या नात्याचे. अहाऽऽहा. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे! थोडक्यात जे मागितले ते विश्वाच्या सुखशांतीसाठी, प्राणीमात्र आणि चराचरसृष्टीसाठी. Pasaydan याचीच तर आवश्यकता आहे. एकीकडे जग युद्धाच्या खाईत आहे. देशादेशांत, प्रांताप्रांतांत, धर्म आणि जातीजातीतदेखील समाज संघर्षाच्या मनस्थितीत असताना पसायदान हे शांतीचे रामबाण औषध आहे. हीच आपली भारतीय संस्कृती. Pasaydan म्हणून तर पसायदान भारतीय संस्कृतीचा जाहीरनामा !

९८२२२६२७३५