---Advertisement---

जळगावातील वाणी दांपत्य सेट परीक्षा उत्तीर्ण

---Advertisement---

जळगाव : येथील वर्षा राकेश वाणी व राकेश वाणी हे दांपत्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा अर्थात (सेट परीक्षा) ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

वर्षा वाणी या के.सी.ई. च्या आय.एम.आर. महाविद्यालय येथे ग्रंथपाल या पदावर तर राकेश वाणी हे डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रभारी कुलसचिव यापदावर कार्यरत आहेत.

या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्या डॉ. गौरी राणे, संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---