---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला एकाच दिवशी तीन धक्के, संघ व्यवस्थापनाला टेन्शन; चार दिवसात घ्यावा लागणार निर्णय

---Advertisement---

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवसात तीन मोठ्या घडामोडी घडल्यामुळे संघाचे समीकरणच बिघडले आहे. सकाळी अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याने अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर दुपारी, कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

स्टोइनिसने क्रिकेटविश्वाला आश्चर्यचकित करत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने त्याला संघात स्थान दिले होते. मात्र, टी-२० क्रिकेटसाठी तो उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता संघात बदल करावे लागतील. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्व संघांना १२ फेब्रुवारीपर्यंत अंतिम संघ जाहीर करायचा आहे.

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

दक्षिण आफ्रिकेतील एसए-२० लीगमध्ये खेळत असताना स्टोइनिसला मांसपेशींमध्ये ताण जाणवला होता. त्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. स्टोइनिसने आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना म्हटले,
“ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा प्रवास अविश्वसनीय ठरला आणि यासाठी मी आभारी आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र, एकदिवसीय क्रिकेटला निरोप देण्याची आणि कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

स्टोइनिसच्या निवृत्तीनंतर लगेचच संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड हे दोघेही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर फेकले गेले आहेत.

कमिन्स अद्याप टाचेच्या दुखापतीतून सावरलेला नाही. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेदरम्यान त्याला या दुखापतीचा त्रास झाला होता, त्यामुळे तो भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोट्यांमध्ये खेळू शकला नव्हता. दुसरीकडे, हेझलवूड पोटरीच्या दुखापतीतून सावरलेला नाही.

स्टोइनिस, कमिन्स आणि हेझलवूड या तिघांच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत कठीण होणार आहे. याआधीच अष्टपैलू मिचेल मार्श पाठदुखीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ व्यवस्थापनासमोर नवा संघ बांधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

स्टोइनिसचा प्रभावी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा आढावा

मार्कस स्टोइनिसने २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ७१ एकदिवसीय सामने खेळताना १४९५ धावा केल्या असून एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. २०१८-१९ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणूनही त्याने गौरव मिळवला होता.

स्टोइनिसने २०२१ च्या टी-२० विश्वचषक आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी पोकळी भरून काढावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियासाठी आगामी काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, त्यांच्या संघ व्यवस्थापनाला जलद पर्याय शोधून संघाची रचना नव्याने करावी लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment