Politics Maharashtra : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृतीचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा परिणामी महाविकास आघाडीवरही होत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नियोजित केलल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, महाविकास आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभा रद्द होणं, यावरून चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, महाविकास आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढील वज्रमुठ सभा कुठे?
14 मे – पुणे – अजित पवार जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.
28 मे – कोल्हापूर – सतेज पाटील जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.
3 जून – नाशिक – छगन भुजबळ जबाबदारी आणि इतर नेते सोबत तयारी करतील.
11 जून – अमरावती – यशोमती ठाकूर जबाबदारी आणि इतर नेते साथ देतील.