तरुण भारत लाईव्ह । अमरावती : “आम्ही सध्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. मात्र २०२४ ची निवडणूक आम्ही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार की नाही याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही.”; असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि मविआचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी केले. रविवारी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
पवार पुढे असेही म्हणाले की, “महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत जागावाटप किंवा निवडणुकीसंदर्भात कुठल्याही चर्चा झालेल्या नाहीत. त्यामुळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार की नाही याबद्दल साशंकता आहे.” उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षेते अजित पवार यांच्यात सध्या सुरु असलेल्या शाब्दिक युद्धानंतर शरद पवारांनी असे विधान करणे म्हणजे महाविकास आघाडीच्या ऐक्याला पवारांनी एक प्रकारे धक्का दिल्याचे दिसते आहे.