सूर्यग्रहणात ग्रहांची विचित्र स्थिती आणि अशुभ योग; ‘या’ तीन राशींची डोकेदुखी वाढणार

तरुण भारत लाईव्ह । १८ एप्रिल २०२३। सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला खूप महत्त्व आहे.  या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी लागणार आहे. सूर्यग्रहण सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. हे सूर्यग्रहण मेष रास आणि अश्विन नक्षत्रात लागणार आहे. सूर्यग्रहाणात दोन अशुभ योगांची स्थिती आहे त्यामुळे काही तीन राशींची डोकेदुखी वाढणार आहे. तर कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष
या राशीतच घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे लग्न भाव असल्याने दोन अशुभ योगांचा या राशीच्या जातकांना फटका बसेल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील. मानसिक स्थिती या काळात ढासळलेली राहील. काही कामं होता होता राहतील.

वृषभ
या राशीच्या जातकांनाही दोन अशुभ योगामुळे फटका बसेल. त्यामुळे या काळात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण एकदम बिघडलेलं राहील. समाजात अपमानाचे अनेक प्रसंग घडतील. त्यामुळे शांत राहा.

कन्या
 या राशीच्या षष्टम भावात सूर्यग्रहण होणार आहे.  कौटुंबिक वातावरण बिघडल्याने त्याचा थेट परिणाम कामावर होईल. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.