2000 Rupees Note Update : आरबीआयकडून 19 मे 2023 रोजी 2000 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोकांनी आतापर्यंत ९८.०८ टक्के नोटा बँकांमध्ये परत केल्या आहेत. मात्र अजूनही लोकांकडे हजारो कोटी रुपयांच्या नोटा आहेत. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
काय आहे ‘आरबीआय’ची अपडेट ?
आरबीआयने सांगितले की, आतापर्यंत 2000 रुपयांच्या 98.08 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. मात्र, अजूनही लोकांकडे ६,८३९ कोटी रुपयांच्या नोटा आहेत. गेल्या वर्षी, RBI ने 19 मे 2023 रोजी चलनातून 2,000 रुपयांची नोट काढून घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी सुमारे 3.56 लाख कोटी रुपये चलनात होते. जे 29 नोव्हेंबर 2024 रोजी कमी होऊन 6,839 कोटी रुपये झाले. आतापर्यंत 98.08 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत.
आरबीआयने सांगितले की, 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. आता रिझर्व्ह बँकेच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये या नोटा बदलण्याची सुविधा अजूनही उपलब्ध आहे. तसेच लोक पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटाही जमा करू शकतात.
शिवाय बँक नोटा स्वीकारणारी आरबीआयची १९ कार्यालये जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर 2,000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.