Petrol Tanker Drivers Strike : इंधन पुरवठा करणा-या वाहनचालकांनी संप पुकारल्याने शासन सतर्क झालंय, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आलंय. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आलेत. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्यात.
इंधन टँकर चालकांचा संपाबाबत तोडगा नाहीच
केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात मनमाडच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चलाखी सहभागी झाल्याने राज्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठा तिढा निर्माण झाला आहे. टँकर चालकांनी दुसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवण्याचा निर्णयावर ठाम असल्याने गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने इंधन कंपनी प्रशासनाने टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र, वाहतूकदार ठाम असल्याने अखेर पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, अद्याप संपाबाबत काहीही तोडगा निघू शकला नाही. उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती. बैठकी नेमका काय तोडगा निघतो.यावरच उद्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा संप सुरू राहतो की मागे घेतला याचा निर्णय होणार असल्याने बैठकीच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाहनचालकांची गर्दी
तीन दिवस राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र, वाहतूकदार संपावर ठाम राहिले. संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आता पोलीस आणि आरटीओ प्रशासनानं दिलाय.
संपाच्या पेट्रोलचा तुटवडा लक्षात घेता वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरूवात केलीये. सांगलीतील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत… केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्या विरोधात देशभरात वाहन चालक संघटनेकडून संप पुकारण्यात आलाय.