देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील सरकारी तेल कंपन्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करू शकतात. दोन्हीच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याचा विचार केला जात आहे.
वास्तविक, तेल कंपन्यांचा नफा तिसऱ्या तिमाहीत 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते, असे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल आणि 2024 च्या निवडणुकीपूर्वी महागाई नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होईल.