नवीन फोन घ्यायचा विचार करताय? मग ‘हा’ फोन ठरू शकतो बेस्ट पर्याय

तरुण भारत लाईव्ह । ३० जानेवारी २०२३। वन प्लस त्याचे काही प्रॉडक्ट लवकरच लाँच करणार आहे. या प्रॉडक्ट मध्ये जबरदस्त फीचर्स आपल्याला पहायला मिळणार आहेत. या मध्ये कोणकोणत्या प्रॉडक्ट चा समावेश आहे आणि वन प्लस चे प्रॉडक्ट लाँच केव्हा होणार आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वन प्लस कंपनी त्याचे काही प्रॉडक्ट लाँच करत आहे. यामध्ये OnePlus 11 5G, OnePlus Buds Pro 2 TWS earbuds, OnePlus TV 65 Q2 Pro आणि OnePlus Pad टॅबलेटचा समावेश आहे. वन प्लस कंपनीने सांगितले कि 7 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये Ace 2 लॉन्च करेल.

OnePlus Ace 2 ला 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. हा फोन Android 13 OS वर चालेल. या फोन चा कॅमेरामध्ये 50MP प्राथमिक लेन्स, 12 किंवा 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मायक्रो लेन्स उपलब्ध असतील. त्याच वेळी, समोर 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. या फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल. जर तुम्ही नवीन फोन घ्यायचा विचार करत असाल तर हा फोन बेस्ट पर्याय असू शकतो.