पिंपळे (ता. अमळनेर): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांसाठी ‘सुंदर माझी शाळा’ हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी राबविण्यात आला होता.
या उपक्रमामध्ये अनुदानित विभागातून पिंपळे आश्रम शाळेने(Pimple Ashram School) प्रथम क्रमांक व अनुदानित आश्रम शाळा लोहारा द्वितीय क्रमांक पटकावला, प्रथम व द्वितीय आलेल्या आश्रम शाळा यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Guardian Minister Gulabrao Patil), जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, प्रकल्पअधिकारी माननीय अरुण पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व 75 हजार रुपयांचा धनादेश देऊन प्राथ. मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्य. मुख्याध्यापक उदय पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
आश्रम शाळेच्या संपूर्ण टीमचे विविध स्तरातून कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष विद्या पाटील सचिव युवराज पाटील,ऍड. अभिजीत पाटील यांनी प्रकल्प अधिकारी यांच्या या उल्लेखनीय उपक्रमाचे कौतुक करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पवनकुमार पाटील सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण, राजेंद्र लवणे सहायक प्रकल्प अधिकारी, मिलिंद पाईकराव कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, विश्वास गायकवाड कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते,
‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमात पिंपळे आश्रम शाळा प्रथम
