तरुण भारत लाईव्ह । मुंबई : पावसाळा येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याने पालिकेकडून पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील खड्डे बुजवण्याठी कोणत्याही ठिकाणी खड्डा पडलेल्या दिसल्यास नागरिकांनी त्या खड्डयाचा फोटो पाठवल्यास पालिका पुढील २४ तासांत तो खड्डा बुजवणार आहे. यासाठी पालिकेच्या वेबसाईटवर खड्डयाचा फोटो पाठवता येणार आहे. याशिवाय सर्व २४ वॉर्डसाठी व्हॉट्सअप क्रमांकही नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार असून यावरही फोटो पाठवता येणार आहे. यंदा १ एप्रिलपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ३३७९१, कंत्राटदारांच्या माध्यमातून १३५०१ आणि पालिकेच्या मध्यवर्ती एजन्सीच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ४८ हजार ६०८ खड्डे बुजवण्यात आले आहेत.
इथे तक्रार करता येईल
खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांना मोबाईल ॲपवरून खड्डयाची तक्रार करता येणार आहे. शिवाय @mybmc ट्विट करता येईल किंवा mcgm.gov.in या वेबसाईटवर तक्रार करता येईल. तसेच MCGM 24×7 हे ॲप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. २४ वॉर्डचे २४ व्हॉट्सॲप क्रमांकही जाहीर करण्यात येणार आहेत. तर १८००२२१२९३ हा टोल फ्री क्रमांक कायमस्वरूपी उपलब्ध आहे.