Plane Crash In Ahmedabad : भारतावर कोसळला दुःखाचा डोंगर, २४१ प्रवाशांचा मृत्यू


Air India Plane Crash In Ahmedabad :  अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे देशावर (भारत) दुःखाचे डोंगर कोसळले असून, देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाले असून, येथील सर्व डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान हे दुपारी १:३८ वाजता धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी ते कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते, सुदैवाने एका प्रवाशाचा जीव वाचला आहे.

पंतप्रधान अहमदाबादकडे रवाना

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाले असून, येथील सर्व डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटींनी व्यक्त केला शोक

बॉलिवूड सेलिब्रेटी सनी देओल, रितेश देशमुख, परिणीती चोप्रा ते दिशा पटानीपर्यंत सर्वांनी पोस्टद्वारे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले आहे- ‘एअर इंडियाच्या अपघाताने मी थक्क झालो आहे. मी सध्या फक्त प्रार्थना करत आहे.’

मृतांची ओळख, सरकारचे आवाहन

गुजरात सरकारने विमानातील लोकांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने देण्याचे आवाहन केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या विमान अपघातात अनेक स्थानिक लोक जखमी झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---