नंदुरबार : जिल्हा वर्धापन दिन व कृषि दिनाचे औचित्य साधत डोंगर्यादेव माऊली संघर्ष समिती, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे, आदिवासी महासंघ तसेच आदिवासी एकलव्य युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ जुलै दरम्यान आठवडाभर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. वन विभागामार्फत दोन हजार रोपे वृक्ष लागवडीसाठी विनामूल्य पुरविण्यात आली आहेत. वन आरक्षित भिलसायीबारा आनंदी माता मंदिराजवळील टेकडीवर चिंच, जांबुळ, आवळा, महू, भावा अशा वनफळ, वनफुल व अन्य जातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.
डोगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे यांनी सांगितले की, वन पर्यावरण रक्षण करण्यासाठी आदिवासींच्या जल-जंगल-जमीन या मुलभूत हक्कावर वनफळ व वनफुलातून मिळणार्या शंभर टक्के उत्पन्नात आदिवासी तरुणांना शित माऊली वन पेन्शन योजनेचा लाभ होवू शकतो. आजच्या तरुणांनी लावलेले झाड पंधरा ते वीस वर्षात फळात व फुलात रुपांतर होवून त्यांना त्या वन झाडापासून लाखोचे उत्पन्न घेवून म्हातारपणी त्यांना या शित माऊली वन पेन्शन योजनेचा फायदा कायमस्वरुपी होवू शकतो.
कॉंग्रेस स्वयंरोजगार सेलचे शहराध्यक्ष रऊफ शहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख पंडीत माळी, युवा सेनेचे अर्जुन मराठे, युवती सेनेचे राज्य सरचिटणीस मालती वळवी, नंदुरबार तालुकाप्रमुख रमेश पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बुथ अभियान जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सोनल चव्हाण, शहराध्यक्ष चेतना माळी, उपतालुकाध्यक्ष सुनिल पवार, निंबा पाटील, अमृत ठाकरे, कांतीलाल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षरोपणासाठी कृषि महाविद्यालयाचे प्रा.राजपूत व प्रा.गिरासे यांनी सहकार्य केले. तसेच जीटीपी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी सहभागी होवून श्रमदान केले. त्याचबरोबर मोहल्ला परिसराचे अतीनभाई, सैय्यद जुनेद, हाजी सलीम शेख, मोहसीन शेख, सादीक शहा, खलील मुस्लीम, नुरु सैय्यद, जुबेर खाटीक, अब्दुल्ला मेंबर आदी उपस्थित होते.