वेध
विजय निचकवडे
Plastic Pollution : हौस भागविण्यासाठी आम्ही पर्यटनस्थळी जातो, गडकिल्ल्यांना भेटी देतो. काही तास घालविले की, निसर्गाप्रतीचे प्रेम संपते आणि घराची वाट धरतो. हे करताना निसर्गाचं वाटोळ करण्याचा निर्धार करूनच तेथून निरोप घेतो, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. आज प्रत्येक पर्यटन स्थळी प्लॅस्टिकच्या कचर्याचा ढीग नजरेस पडतो. नैसर्गिक अधिवास प्लॅस्टिकच्या विळ‘यात सापडले आहेत. म्हणूनच नागझिरासारख्या जंगलातूनही आतापर्यंत 25 हजारांहून अधिक प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे संकलन निसर्गप्रेमींनी केले. जर निसर्गाचे संरक्षण करता येत नसेल तर हरकत नाही; पण किमान नाश तरी करू नये, एवढी अपेक्षा केलीच जाऊ शकते.
आज लोकांच्या गरजा बदलल्या. व्यवहार बदलले आणि पद्धतीही आमूलाग्र बदलल्या! माती आणि धातूच्या भांड्यांची जागा प्लॅस्टिकच्या वस्तूंनी घेतली आणि नाश झाला. हा नाश माणसांचा आणि पशुपक्षी-वन्यप्राण्यांचाही! विघटित न होणार्या प्लॅस्टिकचा वापर वाढला. निसर्ग आपले अस्तित्व गमावून बसला. समुद्र, जंगले, ज्याला ऐतिहासिक असा वारसा आहे, राज्यांचे गडकिल्ले प्लॅस्टिकच्या कचर्याच्या विळ‘यात सापडले. सरकारने म्हणायला (Plastic Pollution) प्लॅस्टिक बंदी केली. यानंतरही पर्यटन स्थळांची ही अवस्था कुठल्या मानसिकतेचे लक्षण आहे? कळायला मार्ग नाही. गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठी जाताना पायर्यांच्या शेजारी, बुरुजावर पडल्या असतात त्या काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या. पर्यटक म्हणून येताना, शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा रवंथ करणारे, रिकामी झालेली बाटली तेथेच टाकून परतीचा मार्ग धरत असतील तर खरेच ते राजेंच्या आदर्शावर चालणारे आहेत का?
गडकिल्ले सोडा आज महाराष्ट्रातील समुद्र किनारे, नद्या प्लॅस्टिकच्या विळ‘यात सापडल्या आहेत. यामुळे समुद्र, नदीतील मासे धोकादायक अवस्थेत असून परिणामी जैवविविधताही धोक्यात आली आहे. (Plastic Pollution) नुकताच पक्षितज्ज्ञ आणि जंगलातून राहून निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेले निसर्गप्रेमी किरण पुरंदरे यांनी सामायिक केलेल्या एका चित्रफितीत नवेगाव-नागझिरा जंगलात झालेल्या प्लॅस्टिकच्या अतिक्रमणाचा समाचार घेतला. आपली हौस भागविण्यासाठी आलेल्या निसर्गविरोधी पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या, पेले तर फेकलेेच; सोबतच काचेच्या दारूच्या बाटल्याही जंगलात फोडून फेकून दिल्या. ज्या भागातून प्राण्यांचा वावर असतो, अशा ठिकाणी टाकलेल्या या बाटल्या प्राण्यांना जखमा करणार्या आहेत. हेच प्लॅस्टिक खाऊन वन्यप्राणी प्राणास मुकतात, हे सांगताना जर निसर्गाचं संरक्षण करता येत नसेल तर करू नका, पण नाश तरी करू नका, असा कळकळीचा सल्ला देणारे पुरंदरे हजार किलोमीटर दुरून येऊन हे सांगू शकतात, तर आम्ही ते आत्मसात का करू नये? आजपर्यंत त्यांनी नागझिरा जंगलातून गावातील मुलांच्या मदतीने 25 हजारांहून अधिक (Plastic Pollution) बाटल्या गोळा केल्याचे सांगणार्या पुरंदरे यांच्यावर हे करण्याची वेळ का यावी, याचा विचार नक्कीच निसर्ग संपविण्याच्या कामात हातभार लावणार्यांनी करावा.
प्लॅस्टिक (Plastic Pollution) कचरा गोळा करण्यामध्ये देश जगात तिसर्या क्रमांकावर आहे. 16 हजार टन कचरा गोळा होतो. एक प्लॅस्टिकची पाण्याची बाटली विघटित होण्यासाठी 100 दिवसांहून अधिक कालावधी लागतो. जलस्रोत दूषित करण्यासोबतच वनसंपदेला हानी पोहोचविण्यात आज प्लॅस्टिक महत्त्वाची भूमिका घेत आहे. ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा पडलेला असतो, त्या खालील जमीन निरुपयोगी ठरते. प्लॅस्टिकमुळे सूर्यप्रकाश, प्राणवायू आत जात नाही आणि निसर्गाची निर्मिती थांबते. आज आम्ही प्लॅस्टिकचा अती वापर, नैसर्गिक अधिवासात केला जात असलेला प्लॅस्टिक कचरा यामुळे निसर्गाच्या निर्मितीस बाधा पोहोचवितो आहोत, याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. आम्ही निसर्गासाठी काही करू शकत नसू, तर आहे त्याचे अस्तित्व संपविण्याचा अधिकार नक्कीच कुणी दिला नाही. आपल्याकडून केली जाणारी (Plastic Pollution) प्लॅस्टिकची ही जीवघेणी घाण योग्य की अयोग्य याचे उत्तर ज्याचे त्याने स्वतःचे घेणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होणार नाही. निसर्गही आपल्यामुळे संपतोय, समुद्रातील जैवविविधता, मासे नष्ट होताहेत, गडकिल्ल्यांचे महत्त्व धुळीस मिळते आहे, याची खंत वाटणार नाही, तोपर्यंत पुरंदरेंसार‘यांना जंगलातील बाटल्याच उचलत राहाव्या लागतील आणि सरकारलाही जागतिक पर्यावरण दिन हा (Plastic Pollution) प्लॅस्टिक प्रदूषण या विषयाला घेऊनच साजरा करावा लागेल.
– 9763713417