– हिमगौरी देशपांडे
Pleasure of Sanskar जीवनाच्या अंतर्बाह्य उन्नत अवस्थेसाठी संस्कृती ही संज्ञा एक गरज आहे. व्यक्ती जन्माला आल्यापासून एका परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली व अव्यक्त पण दृढ अशा सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. मानवाने समाजाचा सदस्य म्हणून जे संस्कार, सवयी, शिस्त आत्मसात केलेल्या असतात त्या सर्वांचे आचरण म्हणजे संस्कृती. Pleasure of Sanskar संस्कृती समाजाच्या जिवंतपणाचा सौदार्हपूर्ण समग्र परिपाक आहे. आपला सारा जीवन प्रवास संस्कारांच्या शिदोरीवरच सुरू असतो. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. म्हणूनच संस्कार आणि संस्कृती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माणूस हा बुद्धिशाली प्राणी असल्यामुळे ज्ञानार्जन ही प्रत्येकाची बौद्धिक गरज आहे. Pleasure of Sanskar संस्कारांतूनच माणसाच्या वृत्तीला वळण लागते. हेच संस्कार माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. माणूस कोणीही असू द्या; त्याच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या अंतरंगातून प्रतिबिंबित झालेल्या त्याच्या वर्तनामुळे तो नेमका कोण आहे? याची जाणीव करून देते.
सुजाण नागरिकाने सुसंस्कृत असणे गरजेचे आहे? Pleasure of Sanskar ‘जन्मना जायते शूद्र: संस्कारात् द्विज उच्यते’ या वचनाचा असा व्यापक, सर्वसमावेशक अर्थ लावल्यास मानवी जीवनात संस्कारांचे स्थान किती अद्वितीय आहे, हे ध्यानात येते. खरे सांगायचे झाल्यास, काल्पनिक मृगजळाच्या मागे धावताना बाह्य प्रलोभनांना भुलून आपण आपल्या व्यक्तित्वाचा संकोच करतो. शिक्षणातून संस्कार होतात. दुर्दैव असे आहे, माणूस सुशिक्षित आहे; सुसंस्कृत नाही. संस्कार ही काही दुकानात मिळणारी वस्तू आहे का? संस्कार असतील तर संस्कृती जपण्याचा विचार होऊ शकतो. म्हणजेच संस्कार आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पालक आपल्या मुला-मुलींना कलेच्या, खेळाच्या, स्विमिंगच्या क्लासला जाण्याची सक्ती करतात. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना पायावर उभे राहता यावे म्हणून आमचा हा खटाटोप चाललाय्, असे सात्त्विक मत पालक व्यक्त करतात. परंतु, नेमक्या कुठल्या गोष्टींमध्ये आपल्या मुलाला रस आहे, यात त्यांना फारसे स्वारस्य नसते. Pleasure of Sanskar आम्हाला अमुक गोष्ट मिळाली नाही, पण आमच्या मुलांना मिळावी, हे कुठलं लॉजिक आहे? आणि त्यासाठी त्यांनी हे असले क्लासेस करावे हा काय हट्ट आहे नेमका?
सुशिक्षित पालकांचा हा असा अट्टाहास पाहता खरेच कशी पिढी घडेल? मी इतके माक्र्स आणले तर मला ते घेऊन द्या, असे पाल्यांना अपेक्षित असते. ही देवाण-घेवाण करायला शिकवतोय का आपण? या सगळ्याला कारण एकच, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा! भौतिकता, चंगळवाद आणि यांत्रिकता यामध्ये आपण सगळे गुरफटून गेलो आहोत. कृत्रिमता वाढल्याने आपण भावनाहीन झालोय. शास्त्रज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती ज्ञानी, विद्वान होते. संस्कारांतून माणूस सत्प्रवृत्त, सदाचारी होतो. तरीसुद्धा व्यसनाधीनता बोकाळतेय्. बळजोरी, अनाचार, भ्रष्टाचार यालाच भाव आहे. Pleasure of Sanskar वडीलधा-यांची शिथिल वागणूक आणि विचार विघातक गोष्टींची पेरणी करतेय. सत्ता व संपत्ती मिळविण्यासाठी नीतिमत्ता विसरली जाते. अन्यायाकडे कोडगेपणाने पाहण्याची वृत्ती वाढली आहे. या सगळ्यांचा उगम स्त्रोत किंवा मूळ नेमकं काय…? ईर्ष्या ! प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वेगवेगळी असते. सतत आपण दुसèयापेक्षा कसे सरस होऊ, हीच भावना माणसाचा -हास करते. आपल्याकडे काय आहे, हे पाहण्याऐवजी समोरच्याकडे पाहून त्याची स्वत:शी तुलना करण्याची माणसाची प्रवृत्ती आहे.
हाताची पाच बोटे सारखी नसतात. मग ही ईर्ष्या, हेवेदावे कशासाठी? इतरांसारखे होण्याऐवजी स्वत:चा वेगळेपणा जपण्यातच मजा आहे. समोरच्याकडे असूयेने नाही तर स्वच्छ, पारदर्शी नजरेने पाहण्याचा एक प्रयत्न आपल्याला माणूस म्हणून उत्तम पद्धतीने जगण्याची चावी देऊ शकते. जगण्याचे समाधान घेणे आणि देणे हीच सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे. अपेक्षांच्या हट्टांमध्ये, अट्टहासांमध्ये आयुष्याची गंमत उरत नाही. Pleasure of Sanskar समाधानाचा आलेख ‘नो प्रॉफिट नो लॉस’ तत्त्वावर मांडून पहा, कोड नक्की सुटेल. आपले विचार, आपले मन, आपल्या अपेक्षा या सगळ्याची गुंफली जाणारी साखळी म्हणजे समाधान! ‘नॉट गुड इनफ’ यातला गुड नेमका काय असतो, हे पण बरेचदा माहिती नसते, तरीसुद्धा असे प्रतिपादन करणारी माणसे असतातच. काही माणसे धनाढ्य असतात, परंतु त्यांच्याकडे माणुसकीची, गुणांची चणचण असते.
उत्तम विचारांची शृंखला माणसाला घडवते, स्पर्धा माणसाची प्रगती कायमची खुंटवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात व्यस्त आहे. सुखद अथवा चांगल्या परिणामाची अनुभूती म्हणजेच आनंद म्हणता येईल. आज बहुसंख्य लोक सुखाला आनंद समजतात. सुख विकत घ्यावे लागते, आनंद न मागता मिळतो. Pleasure of Sanskarओंजळीतील फुलपाखरांचा पुंजका, गरम चहा, छानसे पुस्तक, लतादीदींचे गाणे, सचिनची तुफान फटकेबाजी अशा अनेक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. फक्त त्या उपभोगता आल्या पाहिजेत. इतरांजवळ असलेल्या वस्तू, त्यांची समृद्धी, मिळालेलं यश किंवा त्यांना मिळालेला फायदा पाहून त्यांच्याबद्दल वाटणारी कटुता न ठेवता त्यांचा आनंद त्यांचा आणि आपले सुख, आपला आनंद आपला ही आपली संस्कृती. ज्यांना हे जमले ते सर्वांगाने सुसंस्कृत!
९८६०२९१८६५